मुलांचे मासिक हे गेल्या ९७ वर्षा पासून ( १९२७ ) पासून “मुलांचे मासिक” हे निरंतर बालवाचकप्रिय साहित्य घेऊन प्रसिद्ध होत आहे. महाराष्ट्रातील वय वर्षे ६ ते १४ या गटातील मुलामुलींना वाचनाची गोडी लागावी, त्यांच्यावर सुसंस्कार व्हावेत, त्यांना नवनवीन ज्ञानवर्धक, मनोरंजन साहित्य वाचायला मिळावे, यासाठी “मुलांचे मासिक” कटिबद्ध आहे.
मुलांचे मासिक मध्ये सुंदर अर्थपूर्ण कथा सोप्या, छान कविता, जगातील विशेष घडामोडींची सदरे, विज्ञानविषयक साहित्य, विनोद, चित्र रंगवा, कोडी आदी भरगच्च मजकूर असतो.
निसर्ग, कला, संस्कृती, ज्ञान-विज्ञान, इतिहास आणि अनेक विषयांवरचा वाचनातील मजकूर घेऊन, सप्तरंगी सजावटीने नटलेले हे मासिक दर महिन्याला मुलामुलींसाठी आनंदाचा ठेवा घेऊन येते.