Mulanche Masik

मुलांचे मासिक..चला, वाचू या

मुलांचे मासिक हे गेल्या ९७ वर्षा पासून ( १९२७ ) पासून “मुलांचे मासिक” हे निरंतर बालवाचकप्रिय साहित्य घेऊन प्रसिद्ध होत आहे. महाराष्ट्रातील वय वर्षे ६ ते १४ या गटातील मुलामुलींना वाचनाची गोडी लागावी, त्यांच्यावर सुसंस्कार व्हावेत, त्यांना नवनवीन ज्ञानवर्धक, मनोरंजन साहित्य वाचायला मिळावे, यासाठी “मुलांचे मासिक” कटिबद्ध आहे.
मुलांचे मासिक मध्ये सुंदर अर्थपूर्ण कथा सोप्या, छान कविता, जगातील विशेष घडामोडींची सदरे, विज्ञानविषयक साहित्य, विनोद, चित्र रंगवा, कोडी आदी भरगच्च मजकूर असतो. निसर्ग, कला, संस्कृती, ज्ञान-विज्ञान, इतिहास आणि अनेक विषयांवरचा वाचनातील मजकूर घेऊन, सप्तरंगी सजावटीने नटलेले हे मासिक दर महिन्याला मुलामुलींसाठी आनंदाचा ठेवा घेऊन येते.
मुलांचे मासिकांचे संस्थापक – संपादक कै. बा. रा. मोडक हे त्यासंगी शिक्षक होते; बालमानसशास्त्राचे जाणकार होते. मुलांना वाचायला नेमकं काय द्यावे याचं जागृत भान त्यांना होतं. मुलामुलींवर चांगले संस्कार घडावेत, मुलामुलींचे कुतुहूल वाढविणारा, ज्ञानवृद्धी करणारा, तसेच त्यांचे मनोरंजन करणारा मजकूर, कोवळ्या घडत्या वयात त्यांच्या हातात पडावं यासाठी त्यांनी ‘मुलांचे मासिक’ ची स्थापना केली.
भारताचा इतिहास, संस्कृती, सामाजिक वातावरण, लोक, निसर्ग यांची ओळख मुलांना व्हावी हा मासिकाचा मुख्य हेतू आहे.
मासिकाचे वर्षातून ४ वेगवेगळ्या विषयांना वाहिलेले विशेषांक निघतात. त्यामध्ये त्या-त्या विषयाचे तज्ज्ञ देखील लिहितात. दर्जेदार मजकुरासोबतच सुंदर छपाई आणि आकर्षक सप्तरंगी सजावट हे देखील मासिकाचे वैशिष्ट्य आहे. मराठीत नियमित श्रेष्ठ-ज्येष्ठ तसेच तरुण लेखकांनी मासिकात नियमित लेखन केले आहे. वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, पु. भा. भावे, चि. वि. जोशी, वामनराव चोटघडे, रियासतकार, सरदेसाई, भा. रा. भागवत, दत्ता टोळ, मालतीबाई दांडेकर, विजया जहागीरदार, यांच्यापासून ते राजीव तांबे, फारूक काझी, मुमताज, रहिमतपुरे, एकनाथ आव्हाड, रा. र. बोदाडे, मंदा खांडगे, संजीवनी बोकीळ, नागेश शेवाळकर, धुंडीराम कहाळेकर, अशोक पाटील, अशोक लोटकर, लीला शिंदे, दिनकर देशपांडे, डॉ. प्रदीप आपटे, श्रेयस भावे आदी असंख्य लेखकांनी आजवर मासिकात नियमितपणे लिहिले आहे.
वेळोवेळी मासिकाच्या दिवाळी अंकांना विविध पुरस्कार देखील मिळाले आहेत. मुलांचे मासिकांची गौरवशाली परंपरा आज शतकाच्या उंबरठ्यावरही तितक्याच तेजाने तळपते आहे.
Call Now Button